(2024)आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

या पोस्ट तुम्हाला आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता मिळतील. तुम्ही त्या कविता तुमच्या आई साठी  आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई देऊ शकता.WhatsAap stutas,किंवा massge टाकून तिला खुश करण्याचा प्रयत्न करू शकता.आई आपल्या प्रत्येक कामात खुश असते पण आज तिला आपण येवढं स काम करू तिच्या साठी थोडं वेळ काढून तिला आई कविता  वाचून दाखवू किंवा messge करून तिला आनंदी करू.चला मग पोस्ट ची सुरवात करू.

हे ही  वाचा Birthday Wishes For Brother In Marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा 2023

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

आई तुझं ‘आई’ असं नाव ठेवलं कोणी?
नाही अपेक्षा, नाही तक्रार
असं वागायला शिकवतं का गं तुला कोणी !   वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई !! 

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

पोटभर जेवायला देते तू सगळ्यांना
स्वतःसाठी मात्र शिळेच असते तुझ्या ताटात
आई माझी माय माझी तुझी महिमा किती छान गं
कवियात्रींना पण दिसे तू दुधावरची साय गं! Happy birthday आई!!!

घरात आल्या पाहूण्यांना नेसवते साडी छान ग
पदर तुझा पण फाटका, तुला दिसत कसं न्हाय गं
माझं बाळ, माझा शोन्या दिवस रात्र बोलत राहतेस
थकत कशी न्हाय गं?
समुद्रा एवढे प्रेम देतेस तुला मिळते तरी काय गं? वाढदिवसाच्या शुभेच्छा आई ग!!

आई तुझं ‘आई’ असं नाव ठेवलं कोणी?
नाही अपेक्षा, नाही तक्रार
असं वागायला शिकवतं का गं तुला कोणी ! वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आई!!

 

आई म्हणजे अशी माया

जिला अंत नाही

मी वेडा पाण्यात पाहतो जेव्हा

आईचेच प्रतिबिंब मला दिसत जाई

तुला तुझ्या जन्म दिनी लाख लाख शुभेच्छा आई ग!!

 

 

कविता लिहाविशी वाटते आईवर

तर कधी गावे वाटते तिचे गुणगान

प्रेम शोधले जगात तरी ही

मिळणार नाही आईचे प्रेम महान

अश्या महान आईच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

हे ही वाचा बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई

 

अरे प्रेम, लाड, मदत

हे तर सर्वांची आई करते

पण माझ्यासाठी आई जे करते

ते मला जगातल्या आईंपेक्षा वेगळे वाटते?

आई ही आई असते तुमची माझी सेम असते.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई !

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

सातसमुद्रांच्या पलिकडे

डोंगरदर्‍यांच्या अलिकडे

अश्या ठिकाणी न्यावे आईला

जिथे वात्सल्य व आईच दिसावी सगळीकडे

प्रेमळ आणि माझी काळजी करणारी आई तुला वाढदीवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!!

 

हे ही वाचा मित्रमैत्रिणींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

मोठा झालो असलो तरी मी

आईसमोर लहान आहे

पुन्हा बालपणात जावून

आईच्या कुशीत निजण्याची तहान आहे.

हॅपी बर्थडे mom..!!

 

असते.. प्रेमळ मायेचे लक्षण असते…
आई एक श्वास असते, जिव्हाळ्याची गस असते. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई..!

काळजाची हाक असते आई, निःशब्द जाग असते आई।
अंतरीचे गूढ असते आईं, ईश्वराचे रूप असते ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मम्मी!!!

 

माझं दैवत घरात
माझं दैवत उभं, माझ्याच घरात, आयुष्यभरासाठी, आशीर्वाद देण्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई अशाच आशीर्वाद असू दे माझ्यावर..

 

आई म्हणजे साठ सुखाचा आई म्हणजे देव पृथ्वीवरचा ! आई म्हणजे मायेची ओढ….. आई म्हणजे मैत्रिण गोड। अश्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

आई, तुझ्यापुढे ही,
माझी व्यथा कशाला ?
जेव्हा तुझ्यामुळे ह्या, जन्मास अर्थ आला.

Credit by लेखक – सुरेश भट 

 

आई असताना कसली चिंता अन काळजी माझ्या जीवनरथाची तूच तर सारी… … तूच तर सारथी … वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!!!

माय असे उन्हातील सावली माय असे पावसातील छत्री
माय असे थंडीतील शाल यावीत आता दुःखे खुशाल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मम्मी..!!

 

हे ही वाचा नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

घर सुटतं पण आठवन कधीच सुटत नाही जीवनात “आई” नावाचं पान कधीच मिटत नाही. सारा जन्म चालून पाय जेव्हाथकून जातात शेवटच्या श्वासाबरोबर आई हेचशब्द राहतात…!!! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई!!!

 

रोज सकाळी मनामध्ये तुझा फोन वाजत असतो तुझा आवाज ऐकवत असतो तुझी खुशाली सांगत असतो! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!!!

 

आई ही आईच असते तिच्यासारखे दुसरे कुणीच नसते देव सगळीकडेच असतो म्हणून आईचे अस्तित्व असते आई तुझ्या केल्या कविता अर्पण करते सर्व तुजला आशीर्वाद दे मजला स्पर्श होऊ दे तुझ्या चरणा आनंद हा दे मजला. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई..!!

 

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

मला तू हवी आहेस आई
आज क्षण आनंदाचा उल्हासाचा अन उत्सवाचा सारं काही आहे पण, मला तू हवी आहेस आई
मोह नाही मला ह्या सुखाच्या क्षणांचा पण दुःखात मांडीवर डोकं टेकवून रडण्यासाठी मला तू हवी आहेस आई! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!!

लहानपणी मला मिळलेल्या छोट्याश्या यशाचं तोंडभर कौतुक करायचीस आतासाठी कौतुक नाही केलंस तरी चालेल पण, मला तू हवी आहेस आई!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!!!

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

तू असतीस तर
ह्या गोष्टीवर खुश झाली असतीस त्या गोष्टीवर रागावली असतीस मला तू हवी आहेस आई
कधी वाटतं भरभरून बोलावं मनातलं सगळं तुला सांगावं . अन मग तुझ्याकडूनही काही ऐकावं अगं माझं काही ऐकलं नाहीस तरी चालेल गं मला काही ऐकवलं नाहीस तरी चालेल गं पण, मला तू हवी आहेस आई! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!!

आयुष्याच्या या अवखळ वळणावर पाय डगमगतील तिथे सावरण्यासाठी दुखले खुपले पाहण्यासाठी माझे डोळे आपल्या पदराने पुसण्यासाठी तुला बिलगून रडण्यासाठी मला तू हवी आहेस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मम्मी!!

 

हे ही वाचा बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

आई साठी काय लिहू आई साठी कसे लिहू

आई साठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे

आई वरती लिहीण्याइतपत

नाही माझे व्यक्तिमत्व मोठे

तुला शत शत नमन आई

तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

 

जीवन हे शेत तर आई म्हणजे विहीर

जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर

जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी

जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मम्मी!!

 

आई तू उन्हामधली सावली

आई तू पावसातील छत्री आई तू थंडीतली शाल

आता यावीत दुःखे खुशाल

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस

आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस तु!

तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!

 

आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणी

आई म्हणजे आरतीत वाजवावी

अशी लयबध्द टाळी

आई म्हणजे वेदनेनंतरची

सर्वात पहिली आरोळी……….!!

वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!!

 

हे ही वाचा  वाढदिवसाच्या funny शुभेच्या मित्रासाठी

 

आई एक नाव असतं

घरातल्या घरात गजबजलेल गाव असतं सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आता नसली कुठंच तरी नाही म्हणवत नाही!तुझ्या जन्मदिनी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!!

 

पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात आई मनामनात तशीच ठेउन जाते काही जिवाचे जिवालाच कळावे अस जाते देऊन काही!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

आई असतो एक धागा वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा घर उजळते तेव्हा तीच नसत भान विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पड़त रान! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!!

 

आई कविता

 

आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई आई खरंच काय असते, लंगड्याचा पाय असते वासराची गाय असते दुधावरची साय असते,लेकराची माय असतेआई असते जन्माची शिदोरी सरतही नाही आणि उरतही नाही.

Creditby कवी लेखक- फ. मु. शिंदे

 

 

आई आई तुझा हात वात्सल्याची बरसात आई तुझी माया जशी आभाळाची छाया आई तुझे गाणे तिथे विश्व सारे येते आई तुझी मूर्ती मिळे भक्ती आणि शांती

Credit by  कवी लेखक -प्रज्ञा राजेंद्र दाते, 

 

 

आई : हृदयाची हाक

आई : निःशब्द जाग आई : गूज अंतरीचे

आई : नाव परमात्म्याचे!

आई नसे केवळ काया

आई : ओंजळभर माया

आई : गगन भरारी

आई : पंढरीची वारी !

आई : दुधाळ सावली

आई : आभाळ माऊली

आई : एक अक्षयगान

आई : कर्णाचे दान !

Credit by लेखक कवी – वानखेडे

 

हे ही वाचा  hubby Birthday wishes in marathi

 

आईची महानता सांगायला,

शब्द कधीच पूरणार नाहि, तिचे उपकार फेडायला.

सात जन्म सुद्धा शक्य नाहि.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!!

 

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

 

करावे किती आई तुझे कौतुक अपुरे पडती शब्द है माझे, नाही फेडू शकत. उपकार आई तुझे …अमृतासमान मला तू! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!!

 

आई सारखे दुसरे दैवत नाही असे म्हटले जाते. माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते. ती रोज सकाळी लवकर उठते. ती मलाही लवकर उठवते. मला व्यायाम करायला शिकवते, त्यानंतर मला अभ्यासाला बसवते. सकाळी शांत व प्रसन्न मनाने! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!!

 

 

‘आई’ एक ना

‘आई’ एक नाव

जगावेगळा भाव

‘आई’ एक जीवन प्रेमळ मायेच लक्षण

‘आई’ एक श्वास

जिव्हाळ्याची रास ‘आई’ एक आठवण

प्रेमाची साठवण

‘आई’ एक वाट म्यातील सर्वात पहिली गाठ!!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!!!

 

 

हाताला किती बसले चटके आईने मोजलेच नाही…..

नवऱ्यासह लेकराबाळांचे करता करता

मोठ्यांचा मान राख्ता राखता कितीदा वाकले गेले आईने मोजलेच नाही .! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!!

 

 

आई

आई एक

नाव असतं

घरातल्या घरात

गजबजलेलं

गाव असतं !

सर्वांत असते

तेव्हा

जाणवत नाही

आता नसली

कुठंच

तरीही

नाही म्हणवत नाही.

जत्रा पांगते

पालं उठतात

पोरक्या

जमिनीत

उमाळे

दाटतात

आई मनामनात तशीच जाते ठेवून काही जिवाचं जिवालाच कळावं असं जाते देऊन काही!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!!

 

 

आई, माझी आई…. जाणवत जाते ती अधिकाधिक शोधत जाऊ तेवढं… मुळात आई असते कोण ? आई, म्हणजे आपलीच भाषा अव्यक्त आणि आई म्हणजे न संपणारं प्रेम, आपली अतूट आशा…!!! वाढदिसानिमित्त आई तुला खूप खूप शुभेच्छा !!

 

स्वर्गाचं सुख म्हणजे आई दुःखात आधार म्हणजे आई संकटात पदराआड दडवते आई आणि आजारपणात मायेचं पांघरूण घालते आई आई म्हणजे प्रेरणा आणि आई म्हणजे ममतेनं भरलेलं हास्य…  !      वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!!

 

आईची हाक असते हृदयातून आईची हाक असते मनापासून आईची हाक म्हणजेच आशीर्वाद आणि आईची हाक म्हणजे ‘आतली’ साद…!                                    आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

आईवर जे करत नाहीत प्रेम त्यांना कळलंच नाही खरंखुरं प्रेम अरे, आई म्हणजेच संतांचं धन आई म्हणजे आपलंच मन

आई, माझी आई… कितीही वेळ पाहा, कितीही वेळ अनुभवा मन काही भरतच नाही…! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई साहेब!!

 

आणखी काही वेगळ्या पोस्ट या तुम्हाला नक्की आवडतील!

 

तुम्ही आई कविता व्हिडिओ द्वारे पाहू शकता.

https://youtu.be/y-X924WZ0RQ

निष्कर्ष :

तुम्हाला कशी वाटली मग आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता ही पोस्ट मला आशा आहे की तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई किवा आई कविता खरच  चागल्या वाटल्या असतील.

तुमच्या कडे आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असल्या काही कविता सुचत असतील तर कमेंट मध्ये नक्की शेअर करा .मी नक्की तुमचे कविता या पोस्ट मध्ये add करेल.

तुम्हाला या पोस्ट मध्ये जे काही फोटो दिसत आहे ते मी Canva या वेबसाईट वर तयार केल्या आहेत.जर तुम्हाला देखील अशे फोटो तयार करायच्या असतील अगदी free तर या वेसाइटवरून तुम्ही तयार करू शकता.

तुम्ही असच happysbirthday.co.in या वेसाइट ला प्रेम करणारा आणि इतर लोकांना देखील शेअर करणार.

तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद!

 

FAQ

आईला काय शुभेच्छा?

आई तू माझी दुनिया सर्व काही आहेस.मी तुझ्या कुशीत आणि तुझ्या मिठीत राहून जग पाहिलं तुझे हे उपकार अनंत जन्मी सुद्धा फेडू शकत नाही! तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई साहेब!

आईला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा द्याव्यात?

आई तुला आधी नमन तुला तुझ्या लाडक्या पिलू कडून तुझ्या जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!